पुणे : ‘एमपीएससी’कडून परीक्षा अर्जास मुदतवाढ
Updated On:

पुणे –महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना 19 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
तसेच परीक्षा शुल्क भरण्यासाठी 20 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. या दोन्ही परीक्षेसाठी अनुक्रमे 13 आणि 15 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. यातील संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता.





