पुणे : आपला प्रत्येक श्वास…प्रदूषित

जगात फक्त 1 टक्का नागरिेकांना मिळते शुद्ध हवा
पुणे : जगभरातील विकसित ते विकसनशील आणि गरीब देश सध्या विषारी हवेशी सामना करत आहेत. यामध्ये भारताचाही समावेश आहे. दरम्यान, जगातील हवा धोकादायक पातळीवर पोहचली असून, फक्त 1 टक्का किंवा त्यापेक्षा कमी नागरिकांना शुद्ध हवा उपलब्ध होते, असा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. “लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये याबाबत विस्तृत माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.
पी.एम.2.5 चे प्रमाण वाढले
संशोधन अहवालानुसार, जागतिक क्षेत्राच्या 99.82 टक्के भाग पार्टिक्युलेट मॅटर 2.5 (पी.एम.2.5) च्या धोकादायक पातळीच्या संपर्कात आहे, जे जागतिक आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या सुरक्षा मर्यादेपेक्षा जास्त आहे.
आशिया खंडाला सर्वाधिक फटका
दक्षिण आशिया आणि पूर्व आशियासारख्या प्रदेशांमध्ये हवेची गुणवत्ता विशेष चिंतेची बाब असल्याचे शास्त्रज्ञांना आढळले आहे. येथे, पीएम 2.5 पातळी 90 टक्क्यांहून अधिक दिवस 15 मायक्रोग्राम मर्यादेपेक्षा जास्त होती. हे सूक्ष्म कण वाहनातील काजळी, जंगलातील आग, धूर आणि राख, बायोमास कूक-स्टोव्ह प्रदूषण, वीज निर्मिती आणि वाळवंटातील धुळीपासून तयार होतात. सुमारे 5 हजार ठिकाणी हा अभ्यास ऑस्ट्रेलिया आणि चीनमधील शास्त्रज्ञांनी केला.
अनेक आजारांचे कारण
यात असे म्हटले आहे, की पीएम 2.5 मध्ये अचानक वाढ होणे हे रोग आणि मृत्यूचे प्रमाण वाढण्यामागील एक प्रमुख कारण आहे. आशियाई देशांना आरोग्याच्या काही गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
अनेक आजारांचे कारण
यात असे म्हटले आहे, की पीएम 2.5 मध्ये अचानक वाढ होणे हे रोग आणि मृत्यूचे प्रमाण वाढण्यामागील एक प्रमुख कारण आहे. आशियाई देशांना आरोग्याच्या काही गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.





