Pune: कोथरूड परिसरात अतिक्रमण कारवाई
Updated On:

पुणे – महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून कोथरूड परिसरातील रस्त्याकडेच्या अनधिकृत हाॅटेल तसेच अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. डीपी रस्त्यावरील आशिष गार्डन परिसर आणि पौड रस्त्यावरील आनंदनगर मेट्रो स्थानकाच्या परिसरातील सुमारे १५ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
आशिष गार्डन आणि पौड रस्ता परिसरात इमारतींच्या फ्रंट मार्जिन तसेच साईड मार्जिनमध्ये बांधकाम करून अनधिकृत हाॅटेल सुरू करण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत होता. या बांधकामांना महापालिकेने नोटीसही बजाविली होती. मात्र, अनेकांनी ती काढून घेतो, असे सांगत कारवाई टाळली होती. मात्र, महापालिकेने अखेर शनिवारी या दोन्ही भागात २० पेक्षाअधिक लहान मोठ्या हाॅटेलची अनधिकृत बांधकामे पोलीस बंदोबस्तात काढून टाकली.





