पुणे : वाहन खरेदीला दसरा-दिवाळीत बूस्ट
Updated On:

पुणे – दसरा ते धनत्रयोदशी या काळात शहरात 20 हजार वाहनांची विक्री झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 1 हजार 200 ने वाहन खरेदीत वाढ झाली आहे.
दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे नागरिक दसऱ्याला वाहन खरेदीला प्राधान्य देतात. तसेच, दिवाळीच्या काळात देखील वाहन खरेदी करण्यावर नागरिकांचा भर असतो.
दसरा ते दिवाळी या काळात पुण्यात सर्वाधिक वाहन खरेदी होत असते. यंदा नागरिकांकडून दुचाकी खरेदीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक वाहने खरेदीमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी या काळात 1,929 ई-वाहने खरेदी करण्यात आली होती. यंदा मात्र आतापर्यंत 1 हजार 702 ई-वाहनांची खरेदी झाल्याचे दिसून येत आहे.




