पुणे :- पुणे बांधकाम विश्वात विश्वास आणि गुणवत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या वेंकटेश बिल्डकॉनचा वियोम (Viom) हा नवीन गृहगृप्रकल्प शनिवारी( दि.7 ) सादर करण्यात आला. यावेळी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, बंडू केमसे, प्रवीण गायकवाड, मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ नंदु घाटे, नगरसेविका अल्पना वरपे, गणेश वरपे, श्रीधर जाधव आदी मान्यवर व वेंकटेश बिल्डकॉनच्या विविध प्रकल्पातील ग्राहकांची प्रमुख उपस्थिती होती.
वेंकटेश बिल्डकॉनचे (Venkatesh Buildcon) व्यवस्थापकीय संचालक अंकुश आसबे, संचालक लहुराज आसबे, संचालिका पियुषा आसबे, संचालक अमित मोडगी यांनी सर्वांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरवात झाली. कोथरूडमधील डावी भुसारी कॉलनी येथे वियोम प्रकल्पात घर घेणाऱ्या ग्राहकांच्या हस्ते विटांचे पूजन करण्यात आले. त्यांनी पूजन केलेल्या विटा या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहेत. अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने या प्रकल्पाची सुरवात केली असल्याचे संचालक आसबे यांनी सांगितले.
आपली जीवनशैली अपग्रेड करण्याच्या उद्देशाने घराच्या शोधात असणाऱ्या चोखंदळ कोथरूडकरांसाठी हा प्रकल्प एक उत्तम पर्याय ठरणार आहे. विशेष म्हणजे पर्यावरण पूरक अशा वियोम प्रकल्पाला IGBC प्री सर्टिफिकेशन मिळाले आहे.
2 आणि 3 बीएचके सदनिकांचा समावेश असणाऱ्या 11 मजल्यांच्या दोन इमारती वियोम प्रकल्पात असणार आहेत. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पुरेशी जागा, पाथवेज् ,आऊटडोअर जीम, योगा आणि मेडिटेशन एरिया, पार्टी लॉन, अॅम्फी थिअटर अशा अनेक आधुनिक सुविधा वियोम मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
दरम्यान, प्रकल्पाच्या ठिकाणी ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांची माहिती व्हावी या उद्देशाने `कस्टमर एक्सपिरियन्स सेंटर` उभारण्यात आले आहे. ज्यात प्रकल्पात दिल्या जाणाऱ्या बांधकाम साहित्याची गुणवत्ता ग्राहकांना पाहता येईल.