Pune : पुणेकरांनो, उद्या 2 तास हा महत्त्वाचा रस्ता बंद! दिवेघाटात ब्लास्टिंग; जाण्यापूर्वी पर्यायी मार्ग पाहा
Pune :
Updated On:

Pune : आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवेघाटदरम्यान उद्या (११ सप्टेंबर) रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवेघाट परिसरातील वाहतूक दुपारी १२ ते २ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे.
या कालावधीत नागरिक आणि वाहनचालकांनी संबंधित मार्गावरून प्रवास करणे टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे पुणे शहर वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.





