पुणे जिल्हा : युगेंद्र पवार यांची शरद पवारांवरच भिस्त

बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघातील लढतीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात ही लढाई होत आहे. विकासाच्या जोरावर अजित पवार यांच्याशी सामना करताना बारामतीत युगेंद्र पवार यांना घाम गाळावा लागणार आहे. योगेंद्र पवार यांची भिस्त शरद पवार यांच्यावर आहे.
युगेंद्र पवार यांचा खुद्द शरद पवार यांचा प्रचार करत आहेत. मागील आठवड्यात शरद पवार यांनी बारामती शहर व तालुक्यात काही ठिकाणी तर रोहित पवार यांनी देखील जिरायती भागाचा दौरा करीत सभा घेतली आहे.
युगेंद्र पवार यांचे वडील व अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार त्यांच्या पत्नी शर्मिला पवार प्रचारात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीचा विकास पुरुष म्हणून अशी ओळख असली तरी देखील शरद पवार यांना मानणारा देखील वर्ग बारामतीत आहे. त्यामुळे पवार या मतदारसंघात किती सक्रिय राहतात यावर या मतदारसंघाची गणिते अवलंबून असणार आहेत.





