पुणे जिल्हा : केसनंद येथे युवा सेनेकडून मुख्यमंत्र्यांचा दुग्धाभिषेक

वाघोली : पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरण आणि पुण्यात झालेल्या ड्रग्स पार्टीवर कारवाई या दोन्ही घटनांवर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश देऊन सामान्य नागरिकांना न्याय दिल्याबद्दल मंत्री शंभूराज देसाई आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश सातव मित्रपरिवार व केसनंद ग्रामस्थांच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश सातव यांनी सांगितले की जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे मुळासकट उपटून टाकण्यासाठी व पुण्याची संस्कृती टिकून राहण्यासाठी मंत्रिमहोदयांकडून आदेश आल्यानंतर केलेल्या कारवाईबद्दल त्यांचा दुग्धाभिषेक करून मंत्र्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी बाजीराव चव्हाण, गणेश जाधव, केसनंद गावचे सरपंच प्रमोद हरगुडे पाटील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात व्यसनमुक्ती अभियान राबवण्यात येणार आहे. व्यसनापासून दूर करण्यासाठी पोलीस यंत्रणेच्या मदतीने योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार आहे.
गणेश सातव
जिल्हाध्यक्ष, युवासेना, पुणे जिल्हा





