पुणे जिल्हा : जय मल्हार विद्यालयात ‘योग दिन’ साजरा

जांबूत – येथील जय मल्हार हायस्कूल जांबुत विद्यालयात ‘योगा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सहाशे हून अधिक विद्यार्थ्यांनी योगा केला. विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या शिक्षिका मंदाकिनी पुजारी व शुभांगी माने यांनी योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली.
यावेळी पूरक हालचाली, ताडासन वृक्षासन, मकराजन, शलभासन, वस्त्रासन, पवन मुक्तासन, प्राणायाम आदी असने करण्यात आली. मंगेश रत्नाकर यांनी विश्वशांती ची प्रार्थना करून योगाचा समारोप केला.
कार्यक्रमास मुख्याध्यापक सुनील जाधव, शिक्षक मंदाकिनी आंधळे, मंगेश रत्नाकर, प्रशांत शितोळे, संजयकुमार जोरी, शुभांगी माने, अर्जुन आढाव, आशा गाजरे, सुजाता कापसे, जया गाजरे,
कावेरी घोडे, मनीषा शिस्तार, साहेबराव हरभरे, वसुदेव जोरी, राजकुमार माळवे, जालिंदर राऊत,लहू जोरी, कैलास शिंदे, नितीन पडवळ, योगेश लंके, यशवंत दाभाडे, संदेश पंडित उपस्थित होते.





