Pune District : उद्दिष्टापेक्षा अधिक कर्जवाटप करणार

वाल्हे : शेतकर्यांना सर्वाधिक पीककर्ज वाटप करण्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीकडून जिल्हा बँकेस देण्यात येणार्या उद्दिष्टांपेक्षा अधिक पीक कर्ज वाटप करण्यास आम्हाला नेहमीच यश आले आहे. यंदाही देण्यात येणार्या उद्दिष्टापेक्षा अधिक कर्जवाटप निश्चित केले जाईल; 20 एप्रिल पर्यंत जवळपास सर्व सोसायटीचे वाटप पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले.
वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार, संचालक संजय जगताप यांच्या हस्ते वाल्हे येथील वाल्मिकी विविध कार्यकारी विकास सोसायटी तसेच दौंडज येथील भैरवनाथ विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या सभासदांना खरीप पीक कर्ज वाटपास सुरुवात करण्यात आली.
यावेळी,जिल्हा बँकेचे पुरंदर तालुक्यातील विभागीय अधिकारी महेश खैरे,वाल्मिकी सोसायटीचे अध्यक्ष मदन भुजबळ,माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, दौंडज सोसायटीचे अध्यक्ष प्रताप इंदलकर, सरपंच अतुल गायकवाड, संचालक जयवंत भुजबळ, मोहन पवार, संतोष भुजबळ, चंद्रकांत दुर्गाडे, प्रवीण कुमठेकर, प्रसाद कुमठेकर, देविदास पांडकर, विक्रम भोसले, राहुल यादव, धनंजय पवार आदींसह सोसायटीचे माजी अध्यक्ष,उपाध्यक्ष, संचालक तसेच सोसायटी सभासद,सचिव उपस्थित होते.
पीक कर्जाची मर्यादा वाढवा
महागाई आणि शेतीमध्ये वापरल्या जाणार्या कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली वाढ लक्षात घेता, वाढत्या खर्चाला तोंड देण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पीक कर्जाची मर्यादा वाढवावी,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.





