Pune District : बांदलवाडीत पत्नीचा खून; चारित्र्याच्या संशयावरून टोकाचे पाऊल

बारामती : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने धारदार शस्त्राने वार करीत तिचा खून केला. ही घटना बारामती तालुक्यातील बांदलवाडीत घडली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
संजना लहू वायकर (वय ४०), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या खूनप्रकरणी पती लहू रामा वायकर (वय ४८, रा. बांदलवाडी, ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लहू वायकर आणि संजना वायकर यांच्यात सातत्याने वाद होत होते. लहू हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.
त्यातूनच (दि.२५) रात्री नऊच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. लहूने धारदार शस्त्राने संजनाच्या डोक्यावर, कपाळावर, चेहऱ्यावर वार केले.
यात संजना ही गंभीररित्या जखमी झाली. तिला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भगवान हनुमंत बिसदवडे यांनी फिर्याद दिली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत करीत आहेत.





