पुणे जिल्हा : जय मल्हार विद्यालयात गुलाबपुष्प देऊन स्वागत

जांबूत – येथील जय मल्हार हायस्कूल विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी नव्याने विद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी माजी सरपंच बाबाशेठ फिरोदिया, बाळासाहेब पठारे, पोलीस पाटील राहुल जगताप, पोपट फिरोदिया, माजी चेअरमन नाथा जोरी, भाऊ गाजरे, विकास डफळ, माजी मुख्याध्यापक सतीश फिरोदिया, माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप, बाळासाहेब झिंजाड, जगन जगताप, समाधान बाबर, पंकज पानमंद, विशाल भालेराव, प्रभू पानमंद, बाबाजी शिनारे, मुख्याध्यापक सुनील जाधव, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
उन्हाळी सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय प्रांगणात नवीन विद्यार्थ्यांसमवेत पालकांनी गर्दी केली होती. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळाल्याने मुले आनंदी होते. यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या विकासासाठी आम्ही सोबत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. उपस्थित ग्रामस्थ, पालक व शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांना शासनाने दिलेली मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.





