पुणे जिल्हा : विनयभंगाच्या तक्रारीत पीडितेला ताटकवळे

बारा तास पोलीस ठाण्यात थांबवले : उरुळी पोलिसांचा प्रताप
उरुळी कांचन – विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेला व तिच्या नातेवाईकांना उरुळी कांचन पोलिसांनी तब्बल बारा तासांपेक्षा अधिक काळ पोलीस ठाण्याच्या आवारात ताटकळत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पूनम चौधरी यांच्या हस्तक्षेपानंतर उरुळी कांचन पोलिसांनी पीडितेची तक्रार नोंदवून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या निमित्ताने उरुळी कांचन पोलिसांची बेफिकिरी समोर आली आहे.
संदेश जाधव (रा. खेडेकर मळा) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव असून, हा प्रकार गुरुवारी (दि. 13) घडला आहे. उरुळी कांचन परिसरात महिलेच्या सासऱ्याची एक टपरी आहे. चार दिवसांपूर्वी महिलेचे सासरे जेवणानिमित्त बाहेर गेले होते. शेजारील जाधव हा टपरीवर आला. त्याने महिलेचा हात धरून तिच्याशी अश्लील वर्तन केले. पीडितेला त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. संदेश जाधव याच्यावर पोलिसांत बारा तासानंतर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, ही घटना मंगळवारी (दि. ११) घडली होती. यावेळी जाधव याला महिलेचा पती व त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली होती. जाधव याने दिलेल्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल केला आहे. मात्र, महिला उशिरा तक्रार देण्यास आल्याने पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
अधीक्षकांकडे तक्रार करणार
उरुळी कांचन येथील भाजपच्या युवा कार्यकर्त्या पूजा सणस म्हणाल्या, संदेश जाधव विरोधात विनयभंगाची तक्रार देण्यासाठी एक महिला व तिचे नातेवाईक बारा तासांपेक्षा अधिक काळ पोलीस ठाण्यात बसून होते. मात्र, वरीष्ठ पोलिस अधिकारीच तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करत होते. अखेर पूनम चौधरी आल्यानंतर रात्री उशीरा पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल केला. महिनाभरापूर्वी तळवाडी चौकातील हातगाडी चालकाला मारहाण झाली होती. यात पोलिसांनी गुन्हा दाबून टाकण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या कारनाम्यांबद्दल पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात येणार आहे.
उरुळी पोलिसांनी आरोप फेटाळले
याबाबत पोलीस निरीक्षक शंकर पाटील म्हणाले, तक्रार घेण्यासाठी उशीर झालेला नाही. महिलेवर कुठलाही अन्याय झाला, तर अगोदर महिलेने तात्काळ तक्रार दिली पाहिजे. ज्यावेळी महिलेवर आरोप केला जातो, गुन्हा दाखल केला जातो. यावेळी महिला तक्रार देण्यासाठी येते, तर त्या संदर्भाची शहानिशा करावी लागते,





