Pune District: माळेगावात काका- पुतणे आमनेसामने येणार?

बारामती : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा शरद पवार गट आणि अजित पवार गट आमनेसामने येणार आहेत.
बारामतीमधील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने सामने येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बारामतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही टोला लगावला.
मोदी-शाहांकडे माझी ओळख…
अजित पवार यांनी आगामी माळेगाव साखर निवडणुकीच्या अनुषंगाने भाष्य केले. अजित पवारांनी म्हटले की, माझी मोदी आणि शहा यांच्याशी ओळख आहे, हे तुमच्या आतापर्यंत लक्षात आले असेलच. केंद्रात काम असेल आपल्याकडून होणार, राज्यात काम असेल आपल्याकडून होणार आहे.
सहकार खात्यात काही काम असेल तरी आपल्याकडून होणार. परंतु इतरांचं तसं नाही. कारखान्याच्या इन्कम टॅक्स फक्त अमित शहा यांच्यामुळे निघाला. भावनिक होऊ नका. हे आधीच्या काळात का नाही झाले, असा प्रश्न करीत त्यांनी थेट शरद पवारांवर टीकास्त्र सोडले.





