पुणे जिल्हा : निमगाव भोगीच्या सरपंचपदी उज्ज्वला इचके

रांजणगाव गणपती : निमगाव भोगी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उज्ज्वला अंकुश इचके यांची बिनविरोध निवड झाली. सुप्रिया पावसे यांनी ठरल्याप्रमाणे सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवड करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत उज्ज्वला इचके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी माधुरी भागले यांनी जाहिर केले.
नूतन सरपंच उज्ज्वला इचके यांचा निवडीबद्दल भीमाशंकर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम, आंबेगाव शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील व माजी सभापती विश्वास कोहकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच सुषमा बढे, माजी सरपंच रामदास सांबारे, संजय पावसे, उत्तम व्यवहारे, सचिन सांबारे, अंकुश इचके, ग्रामपंचायत सदस्य विकास रासकर, सिंधुताई रासकर, ज्योती सांबारे, ग्रामसेविका के.आर. गवळी आदी उपस्थित होते. उज्वला इचके यांचे पती अंकुश इचके यांनी या आधी गावात सरपंच व उपसरपंच अशी दोन्हीही पदे भूषवली आहेत.





