पुणे जिल्हा : गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; यवत पोलिसांची कामगिरी

यवत : कासुर्डी (ता.दौंड) गावच्या हद्दीत हॉटेल नूरच्या पाठीमागे पुणे-सोलापुर रस्त्याच्या बाजूला दोन इसम गांजाची तस्करी करत असल्याचे खबर यवत पोलिसांना मिळाली होती.यवत पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई सागर क्षीरसागर यांनी फिर्याद दाखल केली असून त्यानुसार आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की (दि.०३) रोजी कासुर्डी गावचे हद्दीत हॉटेल नूरच्या पाठीमागे पुणे सोलापूर रस्त्याच्या कडेला मोटार सायकल नंबर एम एच १२ के क्यू ७२२८ यावरून आरोपी नामे १) संदिप मधुकर चव्हाते वय.२७ वर्ष, रा. शाश्त्रीनगर, कोथरूड, पुणे २)अक्षय सतीश जाधव वय २४वर्ष, रा. शाश्त्रीनगर, कोथरूड, पुणे हे अवैध गांजा तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती यवत पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार यवत पोलिसांनी सापळा रचून त्यांचेकडून एकूण १८४२१२ रुपये किमतीचा १०.२३४कि. ग्राम. वजनाचा गांजा बेकायदेशीररित्या वाहतूक करताना मिळून आला आहे. त्यानुसार त्यांचेवर यवत पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई सागर क्षीरसागर यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील अधिकचा तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार करीत असून गुन्हा दाखल अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गंपले यांनी केला आहे.





