पुणे जिल्हा : वॉटर फॉल व्हॅली क्रॉसिंगचा थरारक अनुभव

नितीन जाधवांसह गिर्यारोहकांनी काळू धबधबा येथे राबवला साहसी उपक्रम
सासवड : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटाशेजारील काळू धबधबा येथे वॉटर फॉल व्हॅली क्रॉसिंग हा साहसी उपक्रम राबविण्यात आला. अंगावर काटा उभा राहील असे धाडस करत 1200 फुटापेक्षा अधिक खोल व 800 फूट अंतर दोरावरून पार करण्याचा थरारका अनुभव पुणे, विदर्भ, ठाणे जिल्ह्यातील गिर्यारोहकांनी घेतला.
जुन्नर तालुका हा निसर्ग संपन्न तालुका आहे. जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट परिसर नेहमी साहसी पर्यटकांना खुणावत असतो. काळू धबधबा वॉटर फॉल व्हॅली क्रॉसिंग दोन्ही टोकांमधील सुमारे 800 फुटाच्या अंतर दोरावरून पार करणे हा एक थरारक अनुभवच.
800 फुटाच्या व्हॅली क्रॉसिंगची चाचणी ऑक्टोबर 2024 मध्ये सह्यागिरी एडव्हेंचरचे संस्थापक अध्यक्ष दीपक विसे आणि कुसुम विसे यांच्या नेतृत्वात घेण्यात आली.काळू धबधबा व्हॅली क्रॉसिंग मोहिमेतमध्ये 15 जणांचा सहभाग होता. सह्याद्रीतील पर्यटन स्थळांना कचरामुक्त करण्याचे आवाहन सह्याद्रीचे वाटाडे ग्रुपचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी केले.





