पुणे जिल्हा : निंबूतमध्ये रंगला ऑफ रोड वारीचा थरार

चारचाकींची चित्तथरारक स्टंट : सुमारे 57 स्पर्धकांचा सहभाग
युवा नेते जय पवार यांनीही लुटला स्पर्धेचा आनंद
सोमेश्वरनगर – निंबुत-गडदरवाडी (ता. बारामती) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऑफरोड वारी या चित्तथरारक स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक अभिजित काकडे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
ग्रामीण भागात सलग दुसर्या वर्षी ही ऑफरोड वारी पाहण्यासाठी तरुणांनी उच्चांकी गर्दी केली होती. स्पर्धेतील हृदयाचा ठोका चुकवणारे स्टंट पाहून अनेकांचा थरकाप उडाला. दिवसभरात हजारो प्रेक्षकांनी या खेळाचा आनंद लुटत स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. विविध गटातील स्पर्धकांना यावेळी रोख बक्षीस आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रमोद काकडे, माळेगावचे अध्यक्ष केशवराव जगताप, सोमेश्वर कारखान्याचे संचालक राजवर्धन शिंदे, दिलीप फरांदे उद्योजक आर. एन. शिंदे, दीपक साखरे, मदन काकडे यांच्या उपस्थितीत काकडे महाविद्यालयात स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
स्पर्धेत चारचाकी वाहनांसह सुमारे 57 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत महाराष्ट्रसह कर्नाटकातील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत वापरल्या जाणार्या गाड्या फक्त स्पर्धेसाठी न वापरता त्या आपत्ती व्यवस्थापनातही मदत करतात. नुकत्याच वायनाड येथे आलेल्या पुरामध्ये अशाच प्रकारच्या गाड्यांचा वापर बचाव कार्यात करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनीही ऑफरोड वारीचा आनंद लुटला. महिला स्पर्धकही यामध्ये सहभागी झाल्या होत्या. विजेत्या 36 स्पर्धकांना यामध्ये बक्षीस देण्यात आले. जय पवार यांनी सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतला . या स्पर्धेचेआयोजन अभिजीत काकडे, अभिजीत धुमाळ, संकेत जगताप, दीपक येवले, पृथ्वी शिंदे, ऋषिकेश धुमाळ, नेवसे सर, येळे सर, प्रणव डोंगरकर, कुंदे सर, ऐश्वर्या धुमाळ, विकी बनसोडे, शिवाजी गडदरे, धनंजय गडदरे, बापू गडदरे आदी आणि अभिजीत काकडे युथ फाऊंडेशन नींबूत व टॉर्क 4 बाय 4 टीम यांनी केले.
कॅटेगिरीनिहाय पहिल्या दिवशी झालेल्या स्पर्धेतील प्रथम तीन विजेते (गाव)
डीझेल मॉडिफाइ : सर्जेराव कावडे (पुणे), मनोज बिरादार (विजापूर कर्नाटक), सिरीयल डिमेलो (मुंबई).
पेट्रोल मॉडीफा : निखिल भडाळे (पुणे), विनायक बर्गे (कोरेगाव, सातारा) गिरीश पाटील (विजापूर, कर्नाटका) यांनी पटकावला .
डीझेल एक्सपर्ट : वैभव सेलूकर (पुणे), आसिफ फरास (सातारा), राज देशमुख (सातारा) .
पेट्रोल एक्सपर्ट : प्रतिकराज मोहिते (सातारा), निलेश झेंडे (पुणे), विजय जाधव (सातारा)
एसयूव्ही : नवीन नायडू (पुणे), कौस्तुभ नाडगोंडे (कोल्हापूर), करण पोरे (म्हसवड, सातारा)
लेडीज कॅटेगिरी : मीनल शेटे (कल्याण मुंबई), कविता देसाई (विजापूर कर्नाटक).
टाईम रन या अडीच किलोमीटरमधील विजेते
एसयुव्ही : करण पोरे (म्हसवड, सातारा), अमित शेटे (कल्याण मुंबई), वधीराज जोशी (विजापूर कर्नाटका)
लेडीज कॅटेगिरी : कविता देसाई (विजापूर कर्नाटक), मीनल शेटे (कल्याण मुंबई).
डिझेल मॉडिफाइड : मनोज बिरादार (विजापूर कर्नाटक), अभय जाधवराव (कराड), निकुंज वोरा (पाचगणी महाबळेश्वर)
पेट्रोल मॉडीफाय : सर्जेराव कावडे (पुणे), निखील भडाळे (पुणे), गिरीश पाटील (विजापूर कर्नाटक).
डिझेल एक्सपर्ट : आसिफ फरास (सातारा), वैभव सेलूकर (पुणे)





