पुणे जिल्हा : सासवड गोळीबारात आणखी तिघे जेरबंद

बुधवारपर्यंत पोलीस कोठडी : अटक केलेल्यांची संख्या पाचवर
सासवड : शहरातील श्रीशाज आईस्क्रीम पार्लरचे मालक राहुल नामदेव टिळेकर (वय 41 रा. सासवड) यांच्यावर झालेल्या गोळीबार करणा-या आणखी तिघांना सासवड पोलिसांनी शनिवारी (दि. 20) अटक केली आहे.
त्यांना सासवड न्यायालयाने बुधवार (दि. 24) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी दोन तर आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
प्रताप संभाजी जगताप (वय 39 रा मांडकी, ता. पुरंदर), सुमित कमलाकर वाघमारे (वय 19 रा. उंड्री, ता. हवेली), सुजल तमन्ना आंबेकर (वय 20 रा. चंदननगर,
खराडी) यांना बुधवार (दि, 24) पर्यंत तर तर अजय संभाजी जगताप (वय 42 रा. जेजुरी, ता. पुरंदर), दया ऊर्फ दयानंद संभाजी जगताप (वय 35 रा. जुनी सांगवी, पुणे) यांना शुक्रवारी (दि. 19) अटक करण्यात आली असून त्यांना रविवार (दि. 21) पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. अमोल गर्जे हे काम पाहत आहेत.





