राजगुरूनगर – खेड तालुक्याचे आदर्श समाजसेवक अमर बो-हाडे यांनी केलेल्या पाठपुरव्यातून राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या निधीतून वाफगाव येथे सांस्कृतिक सभामंडपाचे काम पूर्ण झाले आहे. वाफगाव येथील संत रोहीदास नगर येथे राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या माध्यमातून सांस्कृतिक सभामंडपास निधी मंजूर करण्यात आला होता. स्थानिक क्षेत्रविकास कार्यक्रमांतर्गत सभामंडपाचे काम पूर्ण झाले आहे. या सभामंडपासाठी खेड तालुक्यातील समाजसेवक अमर बोर्हाडे यांनी पाठपुरावा केला होता. सभामंडपाची रंगरंगोटी करण्यात आली, परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. सभामंडपासमोर हायमास्ट दिवा, परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. हा सांस्कृतिक सभामंडप झाल्याने या ठीकाणी विविध सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक, समाजोपयोगी ,सामाजिक कार्यक्रमांसाठी ग्रामस्थांना हक्काची जागा मिळाली आहे. यासह सभा मंडप परिसरात सिमेंट काँक्रिट करण्यात आले आहे त्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.