पुणे जिल्हा : फार्मर फॉर फॉरेस्ट व पाणी फाउंडेशनसारख्या उपक्रमाची राज्याला गरज – सत्यजित भटकळ

जामखेड : जलव्यवस्थापन जल व मृदसंधारण, गावकर्यांचे उत्पन्न वाढविणे, जंगल निर्मिती, मातीचे आरोग्य सुधारणे व गवताचे संरक्षित कुरान निर्माण करणे या प्रश्नावर काम केल्याशिवाय गावात समृद्धी येणार नाही फार्मर फॉर फॉरेस्ट व पाणी फाउंडेशन सारख्या अनेक उपक्रमाची महाराष्ट्राला गरज आहे. स्वप्नातला गाव निर्माण व्हावीत, जगातून लोक ती पहायला यावे एवढा बदल घडवण्याची कुवत गावातील लोकात आहे हे निश्चित असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ यांनी केले.
शहरातील राज लॉन्स येथे फार्मर फॉर फॉरेस्ट व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ,फार्मर फॉर फॉरेस्टचे मुख्य व्यवस्थापक कृतिका रविशंकर,सीईओ आदित्य अविनाशी,सतीश साळूंखे,कृष्ण चौधरी,आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ,फार्मर फॉर फॉरेस्टचे मुख्य व्यवस्थापक कृतिका रविशंकर म्हणाल्या कि फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स ही एक ना-नफा संस्था आहे ज्याचे उद्दिष्ट भारतातील वनीकरण क्षेत्रात क्रांती घडवून आणणे, कार्बनचे प्रमाण कमी करणे, शेतकऱ्यांना पाठिंबा देणे, हरित रोजगार निर्माण करणे आणि नाजूक परिसंस्था पुनर्संचयित करणे आणि त्यांचे संरक्षण करणे आहे.आमचा असा विश्वास आहे की ग्रामीण समुदायांच्या भागीदारीतच एकमेव शाश्वत पर्यावरणीय पुनर्संचयित आणि संवर्धन हस्तक्षेप शक्य आहे.
शेतकरी आणि ग्रामपंचायतीच्या हजारो हेक्टर जमिनीवर कृषी वनीकरण करण्याच काम, हे फार्मर्स फॉर फॉरेस्ट संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान दरात रोप ठिबक सिंचन सुविधाही पुरवली जाते. तर कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी मदत केली जाते.
तसेच फळबाग लागवडीद्वारे शास्वत उत्पन्न मिळेल या सर्व गोष्टींचा फायदा मिळून देण्यासाठी ही संस्था काम करते.यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर थेट शेतकऱ्याशी संवाद साधत त्याच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी अंजनीकुमार,मनीष सिंग, योगेश फाळके, तुषार चव्हाण, स्वप्नील चव्हाण, तस्लिम फारूक, अरविंद पाटील, निलेश भोसले, अश्रू गायकवाड , ज्ञानेश्वर उगले आदींनी कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी सहकार्य केले.





