Pune District : पुरंदर तालुक्यात पहिली शिवसृष्टी साकारली

सासवड : शिवजयंती निमित्त सासवड नगरपालिका वतीने पुरंदर तालुक्यातील पहिली शिवसृष्टी निर्माण केली आहे. सहकार महर्षी स्व. चंदूकाका जगताप यांच्या संकल्पनेतून व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसृष्टी उभी केली आहे, असे माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
सासवड येथील शिवतीर्थ चौकामध्ये सासवड नगरपालिका शिव स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्यास त्याचबरोबर महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली .
शिवजन्मोत्सवा वेळी पाळणा, महाआरती, शिववंदना कार्यक्रम पार पडला. शिवजयंती निमित्त शिवतीर्थावर बाल शिवव्याख्याती राज गौरी विलास टिळेकर यांचे शिवचरित्र ते व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दिवसभर सासवड शहरामध्ये पोवाडे वाजवून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून वातावरण भक्ती करण्यात येत होते.





