पुणे जिल्हा | प्राथमिक आरोग्य केंद्र निमोणे येथील डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे सर्पदंश झालेल्या मुलीचा मृत्यू ?

शिरूर – निमोणे तालुका शिरूर येथील मजूर विमलकुमार बहादुर राम यांच्या जानवीकुमारी विमलकुमार राम ( वय २ वर्ष ) या मुलीला विषारी सापाने दंष केल्यामुळे तीला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र निमोणे येथे उपचारासाठी नेण्यात आले होते .तेथे त्यांना तब्बल १५ मिनिटं बसवण्यात आले होते.
उपचार न करता तेथील नर्स यांनी या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाही तुम्ही शिरूर येथे जा आणि उपचार करा. असे सांगितले. व पुढील उपचारासाठी नेत असता या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . असे मुलीचे वडील विमलकुमार बहादुर राम यांनी सांगितले आहे.
निमोणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ढिसाळ कारभारामुळे दोन वर्षीय निष्पाप चिमुकलीला जीव गमवावा लागला असल्याने, नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुलीच्या वडीलांनी केली आहे.
बऱ्याचदा या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर उपलब्ध नसतात . शिरूर तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स ह्या दवाखान्यात चालवत असल्याची धक्कादायक भाग समोर येत आहे. वरिष्ठांनी तातडीने चौकशी करून हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांवर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.





