पुणे जिल्हा : पार्क केलेल्या ट्रकच्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी लांबवल्या

शिरूर : शिरुर शहरामधील पोद्दार पार्कीगमध्ये मध्ये उभ्या असलेल्या चार ट्रकच्या तब्बल सात बॅटऱ्या रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या आहेत.
याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल बापु गावडे ( २८ वर्ष ) व्यवसाय – ट्रान्सपोर्ट रा. पोद्दार शाळेजवळ, महाजनमळा यांनी बॅटऱ्या चोरी संदर्भात फिर्याद दिली आहे.
दि . १७ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजल्याच्या सुमारास ते दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ०९. वाजल्याच्या दरम्यान शिरुर मधील पोद्दार पार्कीगमध्ये लावलेल्या ट्रक नं. एम एच १६ सी सी ७२४९ मधील दोन बॅटऱ्या, ट्रक नं. एम एच १४ डी एम ०६३७ मधील एक बॅटरी, एम. एच. १४ – जी. डी – ६१८५ हिच्या दोन बॅटऱ्या, ट्रक न. एम एच १६ सी डी ७२९० हिच्या दोन बॅटऱ्या असा एकूण चार ट्रक मधील ३९ हजार रु किमंतीच्या ७ बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या आहेत.
यासंदर्भातील आधिक तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार खेडकर हे करीत आहेत .





