पुणे जिल्हा । मुळशीतील विद्यार्थिनीच्या सुरक्षेबाबत तत्काळ उपाययोजना करा

पौड । बदलापूर येथे विद्यार्थिनीवर अत्याचाराची झालेली घटना पाहता मुळशीतील सर्व शाळांमध्ये मुलींना घरातून शाळेत येण्यासाठी जाण्यासाठी असणाऱ्या गाडीचा वाहन चालक व मालक यांचा पोलीस व्हेरी फिकेशन,शाळेतील संपूर्ण परिसर सीसीटीव्ही मध्ये येईल याची काळजी घेण्यात यावी.
शाळेत पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकाचा क्रमांक व सुरक्षेच्या उपयोजनाचां फलक लावणे, प्ले ग्रुप ते दहावी बारावी पर्यंत च्या सर्व शाळेतील मुलींसाठी प्रशासनाच्या वतीने एक सुरक्षा समिती निर्मिती करणे शाळेतील लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी हि महिलां कर्मचारी यांच्याकडे असावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. यावेळी स्वराज्य संघटनेचे पुणे जिल्हा निमंत्रक राजू फाले ,हिरामण केमसे ,अक्षय मोरे,महेंद्र पासलकर,संजय पवार, प्रमोद बलकवडे, प्रणीत केदारी उपस्थित होते.
केंद्रप्रमुखांनी आदेश काढून कर्मचारी, चालक, वाहक यांची चरित्र पडताळणी करून घेणे सिसिटीव्ही, वॉशरूम, इतर सर्व पाहणी करण्याचे आदेश देण्यात येईल तत्काळ अहवाल मागून घेण्यात येईल.
गट विकास अधिकारी, सुधीर भागवत





