Pune District : मुळशी तहसीलदार रणजीत भोसले यांच्यावर निलंबनाची कारवाई
Updated On:

पौड – शासकीय कर्तव्य पार पाडत असताना गुणवत्ता व औचित्य न ठेवल्याने कर्तव्यात कसूर केल्याने मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी हा आदेश दिला आहे.
रणजित भोसले यांनी दि टाटा पॉवर कंपनीचे नाव कमी करून धोंडू गोपाल ढोरे यांच्या मालकी हक्काचे आदेश करून नाव दाखल करून अनियमितता केली. या अनियमततेची अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे स्तरावर चौकशी करण्यात आली होती.
यामध्ये 21 एप्रिल रोजी शासनास सादर केलेल्या अहवालामध्ये अनियमितता निष्कर्ष काढण्यात आला आहे. याप्रकरणी 85 वर्षांपेक्षा अधिक विलंब विचारात न घेता अंतिम निर्णय पारीत करण्याची कार्यवाही कायदेशीर नाही. त्यामुळे तहसिलदार भोसले यांची विभागीय चौकशीची कारवाई करण्यात येणार आहे.





