पळसदेव : पळसदेव गावचे सरपंच अंकुश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे गावचे सरपंच पद रिक्त झाले आहे. या सरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसता तरी नवीन सरपंच कोण होणार यासाठी सत्ताधारी व विरोधी दोन्ही गटाच्या जोरदार बैठकांचे सत्र सुरू आहे. यामध्ये विरोधक एकत्र असले तरी सत्ताधार्यांमध्ये मात्र सरपंच पदावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आठ सदस्यांमध्ये सरपंच पदावर एकमत होत नसल्याने सरपंच सरपंच पदाचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे. सत्ताधारी गटातील काही सदस्य विरोधी गटाच्या सदस्यांना मिळून आपल्याला सरपंच पदावर संधी मिळते का, याची चाचणी करत आहेत. त्यासाठी सत्ताधारी सदस्यांच्या विरोधी गटातील सदस्यांबरोबर बैठका सुरू आहेत; मात्र सत्ताधारी आठ सदस्यांची एकत्र बैठक होताना दिसत नाही. सत्ताधारी सदस्यांमध्ये परस्परांविषयी अविश्वास यामुळे त्यांच्यामध्ये दरी अधिकच वाढली आहे त्यामुळे आगामी सरपंच सत्ताधारी गटाचा होईल की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे आहे. सत्ताधारी गटामध्ये पहिल्यांदा सरपंच कोण होणार यावर रस्सीखेच पाहिला मिळत आहे. उरलेला सहा ते सात महिन्यांचा कालावधी पाहता गावाला आगामी दोन सरपंच मिळतील अशी शक्यता आहे. यामध्ये अभी नही तो कभी नही.. या म्हणीप्रमाणे सत्ताधारी गटातील सरपंच पदाच्या स्पर्धेत पुढे असलेल्या दोन सदस्यांमध्ये प्रथम मलाच सरपंच पद पाहिजे यावर घोडा अडून बसला आहे. त्यामुळे सरपंच पदाचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर नेमका सत्ताधारी गटातील सरपंच होईल की विरोधी गट पुन्हा सत्तेत येईल, हे मात्र येणारी वेळच ठरवेल. सध्या मात्र सत्ताधारी गटातील सदस्य केवळ गावच्या पाठीवर सरपंच म्हणून नाव लावण्यासच उत्सुक आहेत गावाच्या विकासापेक्षा केवळ आपलं पाठीवर नाव राहील यासाठी खटाटोप करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी वाटेल ते करायचे तयारी सध्या सत्ताधारी गटातील सदस्यांची पाहायला मिळत आहे. उरलेल्या सहा ते सात महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होणार आहेत त्यामुळे पहिला आपलं घोडं गंगेत न्हाऊन काढावं यासाठी सत्ताधारी गटातील दोन सदस्य आक्रमक आहेत व पहिले मीच सरपंच होणार अन्यथा सरपंच नाही झाला तरी चालेल असे भूमिका सदस्य घेऊन बसले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी गटातील सरपंच होईल असा तरी सध्याचा चित्र दिसत नाही.