Pune District: अवैध दारू विक्रीवर सर्जिकल स्ट्राईक

वाघोली : हवेली तालुक्यात पोलिसांनी अवैध दारू विक्री करणार्यावर सर्जिकल स्ट्राईक करून कारवाया केल्या आहेत. तिन्ही पोलिसांनी मागील तीन दिवसांत 11 पेक्षा अधिक ठिकाणी कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत.
हातभट्टीची दारू तयार करणार्या अड्ड्यांवर, गावठी दारूची विक्री करणार्या ठिकाणी तसेच हॉटेलमध्ये देशी, विदेशी दारूची अवैधरित्या विक्री करणार्यांवर वाघोली, लोणीकंद पोलिसांनी त्यांच्या हद्दीमध्ये तर गुन्हे शाखा युनिट 6 ने वाघोली व लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली.
शहरात काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. त्यांनी पोलीस ठाण्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र त्यानंतरही गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत काही ठिकाणी असे प्रकार सुरूच असल्याचे पुढे आले आहे.
त्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांबाबत चालढकल करणार्या अधिकार्यांना पोलीस आयुक्तांनी तंबी देऊन अवैधधंद्यावर सर्जिकल स्ट्राईक करा, त्यानंतरही धंदे सुरू असल्याचे दिसले तर गुन्हे शाखेच्या माध्यमातून कारवाई केली जाईल. मात्र, त्यानंतर या प्रकाराची गंभीर दखल घेतली जाईल. ठाणे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदलीवर आम्ही थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला आहे.





