Pune District : सीताफळ बहार व्यवस्थापन, छाटणी प्रशिक्षण
Updated On:

नायगाव : पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे पुरंदर तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव, मंडल कृषी अधिकारी एम. व्ही. कचरे व आर. डी. खेसे यांच्या मार्गदर्शनाखाली सीताफळ बहार व्यवस्थापन आणि छाटणी प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
यावेळी अखिल भारतीय कोरडवाहू फळपीक संशोधन केंद्र जाधववाडी येथील शास्त्रज्ञ प्रदीप दळवी यांनी बाहेर व्यवस्थापन,कीड रोग व्यवस्थापन तसेच छाटणीमधील तंत्र प्रात्यक्षिकाद्वारे शेतकर्यांना दाखवून मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी पर्यवेक्षक उद्यंत वाघोले यांनी बोर्डो मिश्रण तयार करणे त्याचा उपयोग याबाबत मार्गदर्शन केले.





