Pune District : पुरंदारमध्ये बुधवारी सरपंचपदाची सोडत
Updated On:

सासवड : पुरंदर तालुतालुक्यातील पुढील कार्यकाळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या सोडती संदर्भात तहसीलदार विक्रम राजपूत यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे.
त्यानुसार पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असून यासंदर्भात सरपंच पदाच्या आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
बुधवारी (दि. 23) सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन दुपारी 12. 15 वाजता आरक्षण सोडत म्हणजेच ड्रॉ घेतला जाणार असल्याचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी पत्राद्वारे कळवले आहे.





