पुणे जिल्हा । लहूजी वस्ताद साळवे यांना अभिवादन

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने बाजार मैदान येथे लहूजी वस्ताद साळवे यांची २३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लहूजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शिरूर तालुका आरपीआयचे तालुकाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कोरेगाव भीमा सेवा समितीचे उपाध्यक्ष, तळेगाव ढमढेरेचे ग्रामपंचायत सदस्य मनोज आल्हाट, माजी ग्रामपंचायत सदस्य पोपट शेलार, ज्ञानेश्वर आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शेलार, अविनाश शेलार, सूरज शेलार, रुपेश शेलार, रमेश शेलार, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गव्हाणे, भाऊ शेलार, सचिन शेलार, सहदेव शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. अविनाश शेलार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.





