Pune District : साखर ग्रामपंचायतीने परिसरात बसविले सीसीटीव्ही कॅमेरे
Updated On:

विंझर : साखर-कोंढवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १५ व्या वित्त आयोगामधून ८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. जिल्हा परिषद शाळा,गावातील काळुबाई मंदिर, सार्वजनिक बस स्थानक तसेच इतर ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात बसवण्यात आले.
ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच वनिता शंकर रेणूसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केलेल्या कामगिरीची दखल घेत ग्रामस्थांकडून त्यांचे स्वागत होत आहे.
राजगड-तोरणा किल्यांमुळे पर्यटकांची वर्दळ या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिक घटनांमध्ये शोध घेताना कॅमेरे मोलाची मदत करतात. म्हणून ग्रामस्थांनी मागणी केली होती. यापुढे देखील जनविकासाची कामे करणार असल्याचे वनिता रेणूसे यांनी सांगितले.





