पुणे जिल्हा : रमेश थोरातांची प्रचारास प्रतिसाद

गावभेटीदरम्यान तरूण, अबालवृद्धाकडून स्वागत
राहू – दौंड विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार रमेश थोरात यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. सध्या चालू असलेल्या गावभेटी दरम्यान मतदार त्यांचे उस्फुर्त स्वागत करीत आहेत. गावभेटीचे रूपांतर सभेत होत आहे.
दौंडच्या पूर्व भागात रमेश थोरात यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत होताना दिसत आहे. तरुण वर्गाबरोबरच अबाल वृद्ध देखील सभेला हजर राहत आहेत. रमेश थोरात यांचा असणारा संपर्क तसेच जुन्या पिढीतील कार्यकर्ते यांचा मेळ बसवत रमेश थोरात यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे.
गाव बैठका, कोपरा सभा आदीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत उमेदवार पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. गाव बैठका असतील किंवा कोपरा सभा असतील, त्यांना मोठ्या प्रमाणात मतदारांचा पाठिंबा दिसून येत आहे. माजी आमदार रमेश थोरात यांनी सभांमध्ये देखील आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
(दि.12) केडगाव येथे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची जंगी सभा पार पडली. या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली. (दि.15) दौंड येथे नगरचे खासदार निलेश लंके व वरवंड येथे पुढील दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा होणार आहे. त्यामुळे मतदारांमध्ये व थोरात गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येत आहे.





