Pune District : राजा रघुनाथराव विद्यालय जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने सन्मानित

भोर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात पुणे जिल्ह्यातील माध्यमिक विभाग खाजगी शाळांमधून भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
पुणे येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भोर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेश राजे पंत सचिव, चेअरमन प्रमोद गुजर व्हाईस चेअरमन मुकुंद तांबेकर, संचालक डॉ.अण्णासाहेब बिराजदार डॉ. प्रदीप पाटील, मधुकर पैठणकर, शशिकांत कंक, दत्तात्रय मोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक भांगे संस्थेचे शैक्षणिक व प्रशासकीय अधिकारी हिंदुराव जाधव, संस्थेच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक माजी शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख अंजना वाडकर यांनी ट्रॉफी प्रशस्तीपत्र , ११ लाख धनादेश स्वीकारला.
शाळांमध्ये पायाभूत भौतिक सोयी सुविधा वाढविणे, शाळांमध्ये शिक्षणा बाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे,विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे,आरोग्य,पर्यावरण,कौशल्य विकास,आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा आणि आनंददायी व प्रेरणादायी वातावरण तयार व्हावे क्रीडा,आरोग्य,स्वच्छतेचे महत्त्व,राष्ट्रप्रेम,व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व तसेच शाळेविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी.या निकषानुसार स्पर्धा घेण्यात आली होती.
एकत्रित योगदानामुळे दर्ज्यात सुधारणा…
मुख्याध्यापक, ग्रामस्थ,पालक, अधिकारी, माजी विद्यार्थी यांनी शाळेच्या विकासात योगदान दिले. शाळांची गुणवत्ता सुधारते व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारत आहे .संस्थेचे अध्यक्ष राजेशराजे पंतसचिव नियामक मंडळ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी पालक आणि माजी विद्यार्थी यांनी एकत्रित केलेल्या प्रयत्नांमुळे विद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद गुजर व सचिव सुरेश गोरेगावकर यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





