Pune District : पुरंदरमध्ये लोकसेवा आयोग केंद्राची निर्मिती करणार

सासवड : पुरंदर तालुक्यात लोकसेवा परीक्षेत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर ती नगन्य आहे. तालुक्यातून लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्या परीक्षेत आपले विद्यार्थी चमकले पाहिजेत हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन पुरंदर तालुक्यात लोकसेवा आयोग केंद्राची निर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन आमदार विजय शिवतारे यांनी केले.
सासवड (ता.पुरंंदर) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृहात छञपती संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार शिवतारे बोलत होते. आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन जयंती सोहळ्याची सुरुवात करण्यात आली होती.
यावेळी समस्त हिंदू आघाडी परिषदेचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, जोतीष आचार्य पंकज महाराज निगडे, व्याख्याते कबीर महाराज निगडे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रमुख हरिभाऊ लोळे, राष्ट्रपती मुख्याध्यापक पुरस्कार विजेते कुंडलिक मेमाणे, अठरा पगड बाराबलुतेदार प्रतिष्ठानचे राज्य अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर, दादासाहेब थोपटे, संदिप लवांडे, योगेश खुटवड, पुरंदर सिंगिग गृपचा संचालिका सुजाता गुरव, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लोणकर, सोशल मीडियाने जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे, अक्षय कोलते, गिरीश जगताप, आबा लोळे आदी उपस्थित होते.
आमदार शिवतारे म्हणाल की, तालुक्यात लोकसेवा परिक्षेचा आभ्यास करण्यासाठी पुरेशा सुविधा नाहीत. तसेच येथील शेतकर्यांना शिक्षणासाठी आपल्या मुलांना मुंबई, दिल्ली या ठिकाणी शिक्षणासाठी ठेवणे परवडत नाही. म्हणून या मुलांना हे शिक्षण तालुक्यातच मिळाले पाहिजे. यासाठी पुरंदर तालुक्यात लोकसेवा आयोग केंद्राची निर्मिती करणार असून याच ठिकाणी रहाणे व भोजनाची व्यवस्था केली जाईल असे आमदार शिवतारे यांनी सांगितले. यावेळी कबीर महाराज अत्तार व मिलिंद एकबोटे यांनी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची माहीती सांगितली छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पोटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन माऊली भिसे यांनी तर हरिभाऊ लोळे यांनी आभार मानले.
या पत्रकारांचा सत्कार
पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा सदस्य प्रकाश फाळके, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता भोंगळे, जेजुरी देवस्थानचे माजी विश्वस्त शिवराज झगडे, गणेश मुळीक यांना संभाजी महाराज आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच दहावी, बारावी परीक्षेत उत्तीर्ण व लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.




