पुणे जिल्हा : बारामतीत महिला सक्षमीकरणावर जनजागृती

बारामती – बारामती जिल्हा व सत्र न्यायालयात महिलांसाठी गुरूवारी तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरणावर जनजागृती करण्यात आली.
मकर संक्रांतीनिमित्त गुरूवारी वकील महिला मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला न्यायाधीश जे. पी. दरेकर, एस. एस. सस्ते, व्ही. व्ही. पाटील, पी. ए. आपटे, एन. व्ही. रणवीर कार्यक्रमास उपस्थित होत्या.
यावेळी महिलांना हळदी कुंकू लावून त्यांना वाण देण्यात आले. तीळगूळ वाटप करण्यात आले. यावेळी महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले. कार्यक्रमास महिलांनी उखाणे घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
बार असोसिएशन सचिव अॅड. प्रिया काटे यांनी प्रास्ताविक केले. महिला प्रतिनिधी कोमल शिपकुले, अॅड. सोनाली मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन अॅड. मनिषा सांगळे यांनी केले. अॅड. ऐश्वर्या भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सर्व महिला वकिलांनी परिश्रम घेतले





