पुणे जिल्हा : भावी डॉक्टर इंदापूर तहसीलवर धडकले

नीटची पुन्हा परीक्षा घेवून फेरनिकाल लावण्याची मागणी
इंदापूर, – शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील वैद्यकीय प्रवेश करिता नीट प्रवेश परीक्षेत झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर नगरपरिषद ते इंदापूर तहसील कार्यालयावर गुरुवारी (दि. 13) हजारो विद्यार्थ्यांनी सकाळी 11 वाजता धडक मोर्चा काढला होता.
परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घेण्यात यावी. तसेच पुनर्परीक्षा तांत्रिक दृष्ट्या शक्य नसल्यास झालेल्या सर्व प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करून फेरनिकाल लावण्यात यावा, या मागणीचे निवेदन तहसीलदार श्रीकांत पाटील यांना देण्यात आले.
गुरुकुल विद्या मंदिर गोखळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण हरणावळ गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली घोषणा देत मोर्चा निघाला होता. यावेळी प्रा. कृष्णा ताटे, शिक्षक शशिकांत शेंडे, विद्यार्थिनी साक्षी व्यवहारे, शिक्षक सुहास मोरे यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी कुणाल काळे,संजय सोनवणे,सुनील अरगडे,माऊली वाघमोडे, नवनाथ रूपनवर, बापू पोळ, वसंत फलफले,सतीश शिंदे,प्रशांत गिड्डे,विश्वास हुलगे,विकास घुगे,नजीर शिकलकर, बाळासाहेब महानवर,विठ्ठल सावंत, संभाजी सूर्यवंशी,संतोष घोडके,रविंद्र सातव व विद्यार्थी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.





