मलठण – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दौंड येथे बूथ कमिटी अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्ते यांची आढावा बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत दौंड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यात खडकी गावचे युवक, सर्वसामान्य घरातील शेतकऱ्याचा मुलगा सचिन रामचंद्र काळभोर यांची दौंड तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बैठकीला सर्व बूथ कमिटी अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, दौंड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, महिला अध्यक्षा भारती शेवाळे, कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सागर बाबा मिसाळ, सोहेल खान, रामभाऊ टुले, योगिनी दिवेकर, स्वाती चिटणीस, बादशहा शेख, प्रशांत शितोळे, सचिन गायकवाड, वंदना मोहिते, हिरालाल राठोड, पैगंबर शेख, विजय तुपे, अजित शितोळे, अतुल राऊत, नवनीत जाधव, गणपत काळभोर, लक्ष्मण सातपुते, संतोष चाकणकर, सर्व बूथ कमिटीचे अध्यक्ष, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. निवडीनंतर काळभोर म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड तालुक्यात युवकांचे संघटन करणार आहे. तसेच त्यांचे प्रश्न सोडविणार आहे. प्रचंड जनसंपर्काची दखल सचिन काळभोर यांचे प्राथमिक ते कॉलेजपर्यंतच शिक्षण काटेवाडी याठिकाणी मामाकडे झाले. त्यांनी पुढे मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण करून बारामती एमआयडीसीमधील नामांकित आयएसएमटी कंपनीत 11 वर्षे ज्युनिअर इंजिनिअर ते शिफ्ट इन्चार्ज या पदापर्यंत काम केले. कंपनीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना कंपनीतर्फे मास्टर ब्रेन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याची आवड सुरुवातीपासून असल्याने त्यांनी करोना काळात आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ जनतेचे प्रश्न सोडवत समाजसेवेत सक्रिय झाल्यामुळे आणि प्रचंड जनसंपर्कामुळेच त्यांना हे पद मिळाल्याची भावना जनमानसात आहे.