पेन्शनधारक आंदोलकांची खासदारांकडून दखल
Updated On:

नगर – महाराष्ट्र राज्य पेन्शन घटना व निवृत्त कर्मचारी 1995 समन्वय समिती नागपूर या संघटनेच्या वतीने पेन्शन धारकांच्या विविध मागण्यांसाठी दिल्ली येथील जंतर मंतर धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये देशातील तीन हजार पेक्षा जास्त पेन्शनर सहभागी झाले होते.
या आंदोलनाची दखल घेत 8 खासदारांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, खासदार राजमनी पटेल, खासदार विजयकुमार गावित, खासदार कुपालजि तूमाने, खासदार ज्योती मनीजी, खासदार रामचंद्र खुटिया, यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले . खासदार सुप्रियाताई सुळे यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन आंदोलकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले.





