मंचर – अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथील गोरक्षनाथ टेकडी येथे रविवार, दि. २१ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव आणि सोमवार, दि.२२ रोजी श्री श्री १००८ ब्रम्हलीन योगी रवीनाथजी उर्फे खडेश्वरी महाराज यांची सहावी पुण्यतिथी साजरी होणार आहे, अशी माहिती श्री महंत योगी कृष्णनाथजी महाराज यांनी दिली. गोरक्षनाथ टेकडी येथे सकाळी ७ वाजता होम हवन व सकाळी ११ वाजता समाधीपूजन व चरण पादुका अभिषेक, श्री श्री १००८ ब्रह्मलीन योगी रवीनाथजी उर्फ खडेश्वरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व सत्सग गुरू महिमा, धायबर ढोल लेझीम मंडळ डूडूळगाव आळंदी यांचा कार्यक्रम होणार आहे. अन्नप्रसाद दुपारी एक वाजता होणार आहे. रात्री नऊ वाजता भजन आहे. सोमवार, दि.२२ रोजी श्री श्री १००८ ब्रम्हलीन योगी रवीनाथजी उर्फे खडेश्वरी महाराज यांची सहावी पुण्यतिथी साजरी होणार आहे. सकाळी ११ वाजता समाधीपूजन व गुरुपूजन, दुपारी १२ वाजता श्री श्री १००८ ब्रम्हलीन योगी रवीनाथजी उर्फे खडेश्वरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, अन्नप्रसाद भंडारा दुपारी दीड वाजता आहे. या कार्यक्रमाचे मुख्य यजमान मनजित सिंग यादव असणार आहेत. या प्रसंगी योगी मिर्चीनाथजी, योगी माई लक्ष्मीनाथजी, योगी संपत नाथजी, योगी राजनाथजी, योगी जगनाथजी ,योगी भूतनाथजी, योगी दिनानाथजी, योगी बेलनाथजी, योगी अमरनाथजी, योगी त्रिशूलनाथजी, योगी मेघनानाथजी योगी तुफान नाथजी, योगी चंद्रिकानाथजी,योगी हंसनाथजी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे सयोजन तांबडेमळा,अवसरी खुर्द ,शेवाळवाडी येथील ग्रामस्थ करणार असल्याचे सागण्यात आले.