Pune District : छत्रपतीच्या आखाड्यात विरोधक उतरले; श्री छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार जाहीर

बारामती : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जय भवानी माता पॅनलच्या विरोधात श्री छत्रपती बचाव पॅनल उभा ठाकला आहे. माजी चेअरमन अविनाश घोलप, माजी संचालक तानाजी थोरात, माजी संचालक मुरलीधर निंबाळकर हे श्री छत्रपती बचाव पॅनलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे छत्रपती कारखान्याची निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळ सुरू आहे.
विरोधी श्री छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे- गट नं. १ लासुर्णे- संजय सोमनाथ निंबाळकर, प्रताप मोहन पवार, गट क्रमांक २ सणसर- संग्राम दत्तात्रय निंबाळकर, अभयसिंह विठ्ठलराव निंबाळकर. गट क्रमांक ३ उध्दट- करणसिंह अविनाश घोलप, तानाजी साहेबराव थोरात.
गट क्रमांक ४ अंथुर्णे- राजेंद्रकुमार बलभिम पाटील, बाबासाहेब भगवान झगडे. गट क्रमांक ५ सोनगांव- रवींद्र भिमराव टकले, गट क्रमांक- ६ गुणवडी- नितीन अशोक काटे, ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन- सत्यजीत भाऊसाहेब सपकळ.
अनुसूचित जाती/जमाती- बाळासो उर्फ भाऊसो गुलाब कांबळे, महिला राखीव- सीता रामचंद्र जामदार, पद्मजा विराज भोसले. इतर मागास प्रवर्ग- संदीप वसंतराव बनकर. भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास- तुकाराम गणपत काळे.




