Pune District : आदर्श राजेंद्र डोळस याला एक कोटीची शिष्यवृत्ती

मांडवगण फराटा : फराटे पाटील महाविद्यालय, मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे बी.सी.ए. केलेला विध्यार्थी आदर्श राजेंद्र डोळस याला सिडणी विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाची एक कोटीची शिष्यवृत्ती मिळाली आहे. विध्यार्थ्यांची गुणवत्ता व आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षणासाठी पात्र विध्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो.
ऑस्ट्रेलिया येथील सिडणी विद्यापीठात ‘मास्टर ऑफ सायन्स ‘ या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र शासनाच्या विध्यार्थी शिष्यवृत्ती योजने अंतर्गत निवड झाली आहे. आपल्या महाविद्यालयात सन २००९ पासून बी.सी. ए. विभाग कार्यरत असलेला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळावीणारा ग्रामीण भागातील आदर्श डोळस हा पहिलाच विध्यार्थी आहे.
हे यश संपादन करून त्याने आई – वडील तसेच फराटे पाटील महाविद्यालयाचे नाव मोठे केले आहे, असे महाविद्यालयाचे अध्यक्ष राजीव फराटे पाटील यांनी सांगितले. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फराटे पाटील, सचिव मृणाल फराटे पाटील, प्राचार्य प्रवीण कुरूमकर व सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विध्यार्थी यांनी आदर्शचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.





