Pune District : भाडेकरूची माहिती न दिल्याने एकावर गुन्हा
Updated On:

वाघोली : भाडेकरूची माहिती पोलिसांना कळविली नसल्याने रायसोनी कॉलेजजवळ एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश लकडे (वय 28, रा. वाघोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
त्यांनी आईच्या नावाने असलेल्या बिल्डींगमधील फ्लॅटमध्ये भाडेकरू ठेऊन भाडे घेत होते. त्याबाबतचा कोणताही भाडेकरार केला नाही. तसेच पोलिसांना माहिती दिली नाही. भाडेकरूची माहिती कळवावी असे आवाहन वाघोली पोलिसांनी केले आहे.





