पुणे जिल्हा : राजगुरूनगरात साडेबारेशे किलो गोमांस जप्त

एकूण 5 लाख 62 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
राजगुरूनगर – राजगुरूनगर जवळ सुमारे साडेबाराशे किलो गोमांससह इनोव्हा कार खेड पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील पुलाच्या खाली राक्षेवाडी गावच्या हद्दीतील सेवा रस्त्यावर (एमएच 01 इनए 9442) इनोव्हा कार शुक्रवारी (दि.29) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलिसांना बघताच वाहन चालक पळून गेला. या वाहनात सुमारे 1240 किलो वजनाचे ओबडधोबड आकाराचे गोमांस आढळून आले.
गोवंशाची बेकायदेशीर कत्तल करून अवैध वाहतूक करणारे हे वाहन पोलिसांनी गोमांसासह ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी साडेपाच लाख रुपयांची इनोव्हा व त्यातील सुमारे साडेबारा हजार रुपयांचे गोमांस असा एकूण 5 लाख 62 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलीस अंमलदार संकेत संजय कवडे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुनाजी जाधव करीत आहे.





