पुणे जिल्हा : ‘लाला’कडून आता मोबाइल बँकिंगची सुविधा

रिझर्व्ह बँकेची मान्यता – अध्यक्ष युवराज बाणखेले
स्व. किसनराव बाणखेले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
नारायणगाव – लाला अर्बन बँकेला मोबाइल बँकिंग सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे. रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळाल्याने मोबाइल बँकिंगची सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीने संगणक विभागातील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यास सुरुवात झाली असून लवकरच ग्राहकांच्या सेवेसाठी मोबाइल बँकिंग सुरू करण्यात येणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी सांगितले.
नारायणगव (ता. जुन्नर) येथील मुख्य शाखेत स्व. किसनराव बाणखेले यांच्या 87 वी जयंतीनिमित्तत अभिवादन कार्यक्रमात बाणखेले यांनी वरील माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एन.सुरम, उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, तज्ज्ञ संचालक अॅड. शंकर शेवाळे, आशिष माळवदकर, रमेश हांडे, विठ्ठल औटी, अॅड. निवृत्ती काळे, रामदास बाणखेले, अशोक गांधी, नितीन लोणारी, नारायण गाढवे, मंगेश बाणखेले, जे. के. थोरात, संदीप लेंडे, डॉ. सचिन कांबळे, सुनिता साकोरे, इंदुमती कवडे, सुनील भुजबळ, भानुदास टेंगले, किरण कर्नाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप मोरे, प्रमोद कांबळे, संतोष पटाडे, मनोहर गभाले, राजेंद्र भूमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जनतेचा आर्थिक स्तर उंचवावा या भावनेतून 50 वर्षांपूर्वी लाला बँकेची स्थापना करण्यात आली. त्याला 12 ऑगस्ट 2024 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने बँकेच्या वतीने शाखा पातळीवर ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष व संचालक यांना सोबत घेऊन बँकेच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा अविरतपणे सुरू ठेवणार आहे. याशिवाय सभासदांसाठी दोन लाख रुपयांचा मोफत अपघात विमा उतरविला असून त्याचा सभासदांना लाभ झाला असल्याचे युवराज बाणखेले यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जाधव यांनी तर संदीप लेंडे यांनी आभार मानले.
बँकेचा आढावा
* शाखा : 14
* एटीएम :7
बँकेच्या मे 2024 अखेर ठेवी
* 438 कोटी
* कर्ज वाटप 294 कोटी
* 31 मार्च 2024 अखेर सर्व शाखा नफ्यात
* शून्य टक्के एनपीए
बँकेस पुणे जिल्हा व्यतिरिक्त अहमदनगर, ठाणे, रायगड, सोलापूर, सातारा जिल्ह्यात कार्यक्षेत्र विस्तार
* अल्प दरात विविध कर्ज योजना
* रेटिंग सिस्टीम नुसार सुलभ कर्जपुरवठा
* कर्ज खाते नियमित असल्यास व्याजदरात एक ते दोन टक्के रिबेट देणार





