पुणे जिल्हा : माळेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी निशिगंध तावरे

बिनविरोध निवद : यापूर्वी उपाध्यक्षपदाचीही धुरा सांभाळलेली
माळेगाव – बारामती तालुक्यातील माळेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी निशिगंध तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माळेगाव बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी निशिगंध विलासराव तावरे यांची एकमताने निवड करण्यात आली. आज सोसायटीच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक पार पडली. यावेळी संचालक मंडळाने एकमताने निशिगंध तावरे यांचे नाव जाहीर केले. निशिगंध तावरे हे 2016 पासून संस्थेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत, यापूर्वी त्यांनी एक वर्ष उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे.
यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक माजी अध्यक्ष रंजन तावरे, बारामती तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक मनोज सस्ते, संस्थेचे मावळचे अध्यक्ष संपतराव लोणकर, उपाध्यक्ष अभिजीत तावरे, संचालक सचिन पैठणकर, शशिकांत तावरे, दिग्विजय जाधवराव, विनोद सस्ते, वसंतराव तावरे, प्रमोद जाधव, दिलीप बुरुंगले, रमेश नलवडे, प्रताप तावरे, विजय भोसले, वीरेंद्र भुंजे, बाळासाहेब सस्ते, सचिव विकास तावरे, शशिकांत देवकाते यांसह सभासद उपस्थित होते.
माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेची 100 टक्के वसुली, 15 टक्के लाभांश, ई सेवा केंद्र यांसह संस्थेच्या ठेवी 1 कोटी 9 लाख 90 हजारापर्यंत असल्याची माहिती संस्थेचे मावळते अध्यक्ष संपतराव लोणकर यांनी आपल्या मनोगतातून विशद केली. खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक मनोज सस्ते, संस्थेचे संचालक प्रमोद जाधव यांनी आपल्या मनोगतातून संस्थेचा होत असलेल्या नावलौकिक व कामाचा आढावा घेतला.
संस्थेची ध्येय धोरणे व उद्दिष्टे लक्षात घेऊन संस्थेच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.
– निशिगंध तावरे, नवनिर्वाचित अध्यक्ष





