पुणे जिल्हा । नवमहाराष्ट्र मित्र मंडळकडून यंदा उज्जैन येथील महाकाल मंदिर देखावा सादर

चिंबळी | खेड येथील शिव प्रतिष्ठान (सलग्न) नवमहाराष्ट्र मित्र मंडळ गेल्या 35 वर्षांपासूनची पंरपंरा जतन करत 36 व्या वर्षात प्रर्दापण करत आहे. यंदा गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साही वातावरण करण्यात आली,. यावर्षी उज्जेन येथील महाकाल मंदिर देखावा सादर करण्यात आला आहे.
या मंदिरात रोज रात्री. 8 वाजता आरती तसेच शनिवार 7 ते गुरुवार दि 13 प्रर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज रविवार 8 तारखेला संगीत खुर्ची तर 9 तारखेला लहान मुलांसाठी मर्दानी खेळाची स्पर्धा होणार आहे. पुढील १ ० दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, 13 तारखेला महापुजा व रात्री आठ ते दहा ह भ प मनमोहन महाराज गिरी यांचे किर्तन व महाप्रसाद आयोजित आले आहे. शनिवार तारखेला 14 खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. रविवार दि 15 रोजी विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये ढोल तासा पथक हा जिवंत देखावा सादर करून गणेश विसर्जन नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.





