पुणे जिल्हा : खासदार डॉ. कोल्हे, शेरकर यांनी घेतला मिसळीचा आस्वाद

ओझर – जुन्नर विधासभेसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सत्यशील शेरकर यांनी मतदानाचा हक्क बजावल्या नंतर नारायणगावमध्ये एकत्रित नाष्टा केला. त्यानंतर डॉ. कोल्हे यांनी स्वतः आपल्या गाडीचे सारस्थ्य करत उमेदवारासह मतदान केंद्रांना भेट दिली.
डॉ. अमोल कोल्हे, उमेदवार सत्यशील शेरकर यांनी बुधवारी (दि. 20) ग्रामदैवतेच दर्शन घेत आपला मतदानाचा हक्क बजवला. मतदानानंतर सत्यशील शेरकर म्हणाले की, पहिल्यांदा स्वतःसाठी मतदान केलं. पण हे मतदान स्वतःपुरते नाही. तर महाराष्ट्राचा स्वाभिमान, निष्ठा आणि तालुक्याचा विकास यासाठी आहे.
त्यानंतर या दोघांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नारायणगाव मध्ये एकत्रित नाष्टा केला. खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, जुन्नरचा आमदार हा 25 हजारांच्या मताधिक्याने विजयी होईल. ही शिवजन्मभूमी आहे. त्यामुळे इथली जनता ही स्वाभिमान, प्रामाणिकपणा आणि निष्ठेसोबत उभी राहते. शदरचंद्र पवारांचे दोन शिलेदार या तालुक्याचा विकास करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





