Pune district: नीरेत विवाहितेची आत्महत्या
Updated On:

नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा येथील विवाहितेने सासूच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी सासूला अटक करून सासवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सासूची रवानगी येरवडा कारागृहात रवानगी केली आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी (दि. 27) माध्यमांना दिली.
नीता सचिन निगडे (वय 33 रा. नीरा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर विजया निगडे-जगताप (मूळ रा. वाणेवाडी, ता. बारामती) असे येरवडा कारागृहात रवानगी केलेल्या सासूचे नाव आहे.
तर मृत नीता निगडे यांचे वडील सुभाष शंकर माने (रा. श्रीगोंदा ता.आहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी अधिक तपास करत आहेत.





