पुणे जिल्हा : कुरुळीत रंगले मंगळागौरीचे खेळ

चिंबळी – कुरुळी येथे आमदार दिलीप मोहिते पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा मोहिते पाटील यांनी आयोजित केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मंगळागौरी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
महिलांना पारंपरिक पद्धतीने मंगळागौरीची आठवण यानिमित्ताने झाली महिलांनी विविध गाण्यांवर मनमुराद आनंद घेऊन मंगळागौरीचा कार्यक्रम साजरा केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाबाबत माहिती आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली.कुरुळी, मोई, निघोजे, चिंबळी येथील महिला बचतगट, महिला मंडळ, राष्ट्रवादी महिला पक्षाच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा मोहिते, शांताराम सोनवण, माजी सभापती विलास कातोरे, माजी सरपंच शरद मु-हे, सामाजिक कार्यकर्ते भरत कड, जालिंदर गवारे, सुंनदा जगनाडे, अमृता जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचलिका कमल कड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष संजय जाधव, सन्मार्ग फाउंडेशनचे अध्यक्ष शीतल येळवंडे, अन्नपुरवठा संरक्षण समितीच्या सदस्य सुनिता काळडोके आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.





